केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केल्याप्रमाणे, 15 ऑगस्टपासून NHAI च्या टोल नाक्यांवर प्रवाशांसाठी फास्टॅगचा वार्षिक पास सुरु होणार आहे. हा पास 3000 रुपये असून, त्याच्या माध्यमातून 200 फेऱ्यांपर्यंत टोल न भरता प्रवास करता येणार आहे. हा पास खासगी चारचाकी, जीप आणि व्हॅनसाठी लागू असून, व्यावसायिक वाहनांसाठी नाही. पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर आणि इतर द्रुतगती महामार्गांवर हा पास वापरता येणार आहे.