गणेशोत्सव काळात पुणे शहरातील विश्रामबाग, फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दारूची दुकाने, बार व रेस्टॉरंट्स 10 दिवस बंद ठेवण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर विसर्जन दिनासह एकूण 7 दिवसांसाठी लाऊडस्पीकर वापराला मध्यरात्रीपर्यंत परवानगी दिली आहे.