सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे 14 वर्षीय शाळकरी मुलीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह बाथरूममध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या शाळकरी मुलीने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला? याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून खंडाळा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती. आई- वडिलांनी तिला उपचारासाठी शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.