जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील एकूण २०७ कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मार्च २०२५ मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर केवळ पाच महिन्यांच्या अल्प कालावधीत पदोन्नतीचा लाभ दिला आहे. ही पदोन्नती प्रक्रिया जिल्हा परिषदेत समुपदेशन पद्धतीने राबविण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व न्याय ठेवल्याचे विशेष आहे.