अमरावती जिल्ह्याच्या मंगरूळ खंडेश्वर येथे राहणारे 38 वर्षीय पुरुषोत्तम सुरेश चौधरी यांचा एक महिन्या आधी दुचाकी अपघात घडला होता. त्या अपघातात त्यांच्या पायाला किरकोळ मार लागल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केले होते. या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदन करण्यापूर्वी त्यांच्या पोटाला टाके दिसून आल्याने नातेवाईकांनी संशय व्यक्त केला. किडनी काढल्याचा थेट आरोप डॉक्टरांवर करण्यात आला होता. नातेवाईकांनी संताप व्यक्त करून शवविच्छेदन काही वेळासाठी रोखण्यात आले. यावेळी काही वेळाने नातेवाईकांची समजूत काढून शहर पोलिसांच्या देखरेखित इन कॅमेरा शव विच्छेदन करण्यात आले असता बावणे कुणबी समाज मंडळ वतीने 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे डॉक्टरांची तक्रार करण्यात आली.