एक एकर टोमॅटो पिकातूंन लाखोंचा नफा..
लॉटरीद्वारे श्रीमंत होण्याची कहाणी तुम्ही अनेकदा ऐकली असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत ज्याने पिकांची लॉटरी जिंकून श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या खादगाव येथील गणेश सर्जेराव काकडे या शेतकऱ्याला रोज टोमॅटो पिकातून चांगला नफा मिळत आहे. केवळ एक एकर टोमॅटो क्षेत्रातून सात ते आठ लाख रूपयांचा नफा या शेतकऱ्याला मिळणार आहे. साधारणपणे शेती करणे हा तोट्याचा व्यवसाय मानला जातो. पीक चांगले आले तरी भाव कमी मिळाला तर रस्त्यावर फेकून द्यावे लागते. छत्रपती संभाजीनगरच्या या बाजारपेठेमध्ये त्याच्या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.












