धाराशिवच्या परंडा मतदारसंघातील माजी आमदार राहुल मोटे हे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सलग तीन वेळा आमदार राहिलेले मोटे यांनी आतापर्यंत पाच निवडणुका लढवल्या आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा तानाजी सावंतांकडून दीड हजार मतांनी पराभव झाला होता. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीतून लढवलेली ही त्यांची शेवटची निवडणूक ठरली. स्थानिक राजकारणात मोटे यांची दमदार पकड असून, भूम-परंडा-वाशी तालुक्यांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. मोटे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे जवळचे नातेवाईक असल्याने त्यांचा प्रवेश पक्षासाठी मोठं बळ ठरणार आहे.
(i/p Byte )