राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी झाल्यानंतर भरणे यांची नियुक्ती झाली. फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांनी राज्यभर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचा निर्धार व्यक्त केला. पदभार स्वीकारताच MPSC पात्र १४ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर सही केली. मात्र इंदापूर येथील महसूल दिनानिमित्त दिलेले “वाकडं करून सरळ करणं लक्षात राहतं” हे विधान चर्चेचा विषय ठरले. भरणे हे इंदापूर मतदारसंघातून निवडून आलेले असून, सहकार क्षेत्रात त्यांचा भक्कम अनुभव आहे.