खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक झाल्यानंतर महिला आयोगाने उडी घेतल्याने रोहिणी खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. बीडच्या ‘कु. सानवी संस्थे’ने दिलेल्या तक्रारीवरून खडसेंनी ही संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित असल्याचा आरोप केला. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोग व ही संस्था कुठे होती, असा सवाल करत खडसेंनी महिला आयोगावर घणाघात केला.