चंद्रपूर शहरातील खराब रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांसाठी काँग्रेसने आंदोलन छेडले. महात्मा गांधी रोड, पठाणपुरा, जटपुरा गेटसह अनेक भागांतील खड्ड्यांमुळे वाहतूक, अपघात आणि आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात बागला चौक ते कामगार चौकपर्यंत आंदोलन करण्यात आले. खड्ड्यांना ‘इव्हेंट आमदार मार्ग’ असे प्रतीकात्मक नाव देत जोरदार घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.