पुणे महापालिकेत आयुक्त नवल किशोर राम यांच्या दालनाबाहेर मनसेने तीव्र आंदोलन छेडले. 20 लाखांच्या चोरीसंदर्भात जाब विचारायला गेलेल्या कार्यकर्त्यांना “गुंड” म्हणल्याचा आरोप करत त्यांनी ठिय्या आंदोलन केले. 1.30 तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी सर्व मनसैनिकांना ताब्यात घेतले. आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं की, मी गोंधळ घातल्यामुळे त्यांना गुंड म्हटलं. हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.