अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त आयात कर लावण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशामुळे अमेरिकेचा भारतावर एकूण आयात कर 50% झाला आहे, जो 27 ऑगस्टपासून लागू होईल. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांवर हे कर लावले असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठामपणे प्रत्युत्तर दिलं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी भारत कधीही तडजोड करणार नाही, असं सांगितलं.












