बुलढाण्याच्या मेहकर लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे 65 हजार 601 हेक्टर शेती बाधित झाली होती. यावर आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांसाठी मदतीचा निर्णय घेतला आहे. सरकारने जिल्ह्यासाठी 76 कोटी आणि मेहकर लोणारसाठी 66 कोटींची मदत मंजूर केली आहे. लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.












