धुळेतील पांझरा नदीपात्रात परवानगीशिवाय तब्बल एक किलोमीटर लांबीची व पाच मीटर उंच गॅबियन वॉल बांधकाम सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. हे काम लेआउट पाडून प्लॉट विक्रीसाठी असून संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा दावा करण्यात आला. हे बेकायदेशीर बांधकाम तातडीने थांबवून चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली आहे.












