चोपड्यात पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाच्या सरी बरसल्या. उष्णतेने हैराण नागरिकांना गारव्याचा दिलासा मिळाला, तर पिकांची अवस्था बघता शेतकऱ्यांचा जीवात जीव आला. मात्र नदी-नाले भरून पिकांचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी अजूनही जोरदार पावसाची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे












