ठाणे महानगरपालिका कुठल्याही गणेशोत्सव मंडळांवर अन्याय करत असेल, तर काँग्रेस त्यांच्यासोबत ठामपणे उभी राहील आणि कायदेशीर बाबींची तपासणी करून महानगरपालिकेला जाब विचारेल, असे आश्वासन ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिले. आज ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने 2024 सालचा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच, विविध घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांचाही सन्मान करण्यात आला.












