बीडच्या परळीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे स्थान असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज, श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी, मोठ्या उत्साहात भाविकांनी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात वैद्यनाथाच्या गजराने भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. आज श्रावणी सोमवार निमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली.












