सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात आलेली ‘व्हॉईस ऑफ देवेंद्र’ ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा राजकीय वळण घेत आहे. आमदार रोहित पवारांनी या स्पर्धेला राजकीय अजेंड्याचा भाग होऊ नये अशी टीका केली आहे. यावर विद्यापीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.