वसई पश्चिमेतील किशोर कुंज सोसायटीत चोरट्यांनी वृद्ध उधोजी भानुशालींना टॉयलेटमध्ये बंद करून घरातून 1.5 कोटींचे रोख, दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात भीती पसरली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींचा शोध सुरू आहे.