वाशिम जिल्ह्यातील जामखेड गावातील लाडका नंदीबैल ‘श्याम’ च्या निधनाने गावात शोकाकुळ पसरली. वर्षानुवर्षे श्री जागृत हनुमान संस्थान मंदिराशी जोडलेला आणि गावकऱ्यांचा लाडका असलेला श्याम काही दिवसांपासून आजारी होता. ग्रामस्थांनी औषधोपचार केले, मात्र तो वाचू शकला नाही. फुलांनी सजवून काढलेल्या अंतिम यात्रेत गावकऱ्यांनी अश्रूंनी अखेरचा निरोप दिला.












