वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या शिबिरादरम्यान गोर संघटनेचे अध्यक्ष चंदन ब्रह्मानंद राठोड यांनी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व दोन आरोग्य सेविकांवर खुर्ची फेकून हल्ला करत शिवीगाळ केली. या घटनेमुळे शिबिरातील सेवा विस्कळीत झाली व रुग्णांमध्ये भीती पसरली. संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर उखळे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












