चंद्रपूर जिल्ह्यातील जांभुळघाट आदिवासी शासकीय आश्रमशाळेत अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ५३८ पैकी तब्बल २६७ विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली असून नऊ विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ११ ऑगस्टला रक्ताच्या उलट्या, हातापायांची सूज, चक्कर अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर गोंधळ उडाला. आदिवासी संघर्ष समितीने शाळेत शिळे अन्न दिल्याचा आरोप केला असून आरोग्य विभाग तपास करत आहे.