चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह 15 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील मित्र नगर परिसरात घरात पाणी शिरून नुकसान झाले असून रस्ते जलमय झाले आहेत. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पावसामुळे धान, कापूस व सोयाबीन पिकांना दिलासा मिळाला आहे.