पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. सिंधू पाणी वाटप कराराचा हवाला देत, जर भारताने पाकिस्तानकडे येणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर ते या कराराचे उल्लंघन असेल आणि पाकिस्तान याचे “निर्णायक उत्तर” देईल, असे शरीफ म्हणाले. दोन्ही देशांमध्ये सिंधू नदीच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.