अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यात फोनवर चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी भविष्यात सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला. पुतिन आणि किम यांच्यातील ही चर्चा “उबदार मैत्रीपूर्ण वातावरणात” झाल्याचे उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने सांगितले आहे. या चर्चेला भू-राजकीय घडामोडींमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.