अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, व्यावसायिक राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी दोघांवर ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एका मुंबईस्थित व्यावसायिकाने त्यांच्यावर ‘बेस्ट डील टीव्ही’ कंपनीच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.