बापीजवळ राष्ट्रीय महामार्गावर खाटू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भक्तांची पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रेलरला धडकली. या भीषण अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान आणखी एका भक्ताचा मृत्यू झाला. गंभीर जखमींना जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात हलविण्यात आले असून काहींवर दौसा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.












