१५ ऑगस्टला काही महापालिकांनी कत्तलखाने व मांसविक्रीवर घातलेल्या बंदीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “स्वातंत्र्यदिनी लोकांचे खाण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे, कोणी काय खावं-न खावं हे सरकार किंवा महापालिकेने ठरवू नये,” असे ते म्हणाले. या निर्णयामुळे मांसाहार-शाकाहार वादाला पुन्हा उधाण आले आहे.












