बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बाजूलाच असलेल्या सनराईज हॉटेलमधील फुटलेल्या सांडपाणी पाईपलाइनमुळे घाण पाणी रस्त्यावर साचले आहे. यामुळे परिसरात दमट दुर्गंधी पसरली असून येणाऱ्या नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना त्रास होत आहे. नागरिकांनी संबंधित विभागाकडे त्वरित दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.












