अमरावतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आणि चालक ACB च्या जाळ्यात अडकले आहेत. दारू विक्रीसाठी महिन्याकाठी १५ हजार रुपयांची लाच मागणी केल्याच्या आरोपाखाली निरीक्षक सुरज दाबेराव आणि चालक संजय देहाडे यांना ACB ने अटक केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.












