वाई विभागाचे पोलीस उपधीक्षक बाळासाहेब भालचिम यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. बाळासाहेब भालचिम हे मागील
सव्वादोन वर्षांपासून वाई येथे उपअधीक्षक म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी त्यांनी नागपूर शहर, नांदेड, सोलापूर, मुंबई, कोल्हापूर शहर व सातारा जिल्ह्यात आपल्या प्रदीर्घ सेवेत गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट कामकाज केल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.












