बारामतीत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काही तरुणांचा रोडशो थांबवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. अति वेग, ट्रिपल सीट, बदललेले सायलेंसर आणि कानठळ्या बसवणाऱ्या १७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, असून या मोहिमेत १२ अल्पवयीन मुलांचा समावेश होता, जे वाहने चालवत होते. वाहतूक पोलिसांनी इशारा दिला की अशा वर्तनावर फक्त दंड नाही तर गुन्हा दाखल केला जाईल.