सोलापूरातील जुना विडी घरकुल परिसरातील गाडगी नगरात एसीचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत 40 वर्षीय पल्लवी प्रवीण सग्गम यांचा मृत्यू झाला. स्फोटानंतर आग घरभर पसरली आणि त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. अग्निशमन दलाने आग विझवली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.












