मुंबईत दहीहंडी उत्सवात आनंदात आलेली दुर्दैवी वेळ! मानखुर्द व अंधेरीत दोन गोविंदांचा अपघाती मृत्यू झाला. तर शहरातील विविध ठिकाणी थर लावताना पडल्याने तब्बल 30 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.












