खामगाव-बुलढाणा रस्त्यावर रोहणा गावाजवळ दोन कारची समोरासमोर भीषण टक्कर झाली. अपघातात एका कारचा टायर फुटला, तर दुसरी कार पावसामुळे स्लीप होऊन तब्बल तीन पलट्या मारत शेतात जाऊन आदळली. या दोन कारमध्ये चार जण प्रवास करत होते. त्यापैकी दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.












