मुंबईत दहीहंडीच्या जल्लोषात बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा चांगलाच दणका बसला. एका दिवसात वाहतूक पोलिसांनी तब्बल 10,051 ई-चलन काढत सुमारे ₹1.13 कोटी दंड वसूल केले. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन नेणे, तिघे बसणे आणि वेगमर्यादा ओलांडणे हे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत . पोलिसांनी इशारा दिला की अशी कारवाई पुढेही सुरूच राहील.