मुंबईतील लोअर परळमध्ये औषधांच्या पार्सलवरून वाद वाढला आणि डिलिव्हरी बॉयवर एका व्यक्तीने रागाच्या भरात ‘एअर गन’ने हवेत गोळी झाडली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आरोपी सौरभ कुमार अविनाश कुमार सिंग (३५) याने चुकीचे औषध आल्याचा दावा करत डिलिव्हरी नाकारली आणि संतापून गोळीबार केला. एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.












