बेंगळुरूमध्ये ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा: चैप्टर 1’च्या शूटिंगदरम्यान मिमिक्री आर्टिस्ट आणि अभिनेता कलाभवन निजू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना छातीत दुखू लागल्याने तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. यापूर्वीही कांतारा-2 च्या सेटवर कलाकारांचा मृत्यू, बस अपघात आणि वादळामुळे नुकसान अशा घटना घडल्या आहेत.