जालना जिल्ह्यातील घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशयाचे जलपूजन आज अंदाज समिती प्रमुख तथा आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्यास माजी नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार खोतकर यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याची आठवण करून देत ग्रामस्थांना जलसंवर्धन व जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आश्वासनही दिले.