जालना शहरातील बसस्टँडसमोरील दुर्गा लॉज येथे स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. महेश कदम हा व्यक्ती दुर्गा लॉज भाडेतत्त्वावर घेऊन बाहेरून महिलांना आणत वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन संशयित पुरुषांना ताब्यात घेतले तसेच तीन पीडित महिलांची सुटका केली. आरोपीकडून ₹32,000 रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.