वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेतात साचलेल्या पाण्यात बसून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यंदाच्या खरीप हंगामात तब्बल चार वेळा अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, हळद, कपाशी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 14 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून दहा पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नव्हे तर एका शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यूही झाला आहे.