बीडच्या परळी तालुक्यातील परळी–बीड रस्त्यावर कवडगाव–शिरसी मार्गावरील ओढ्यात मध्यरात्री कार अडकण्याची घटना घडली. कारमध्ये चौघेजण प्रवास करत होते. त्यातील एकाची मध्यरात्री तर दोघांची सकाळी सुखरूप सुटका करण्यात आली, मात्र एकजण अजूनही अडकलेला आहे. ही मंडळी लग्नासाठी कारने जात असताना ओढ्याला आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी अडकली. सर्वांनी झाडाचा आसरा घेतला होता. रात्रीपासूनच परळीचे उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षक आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.