शिर्डी–शनीशिंगणापुर मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा मोठा त्रास होत असून भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सुट्ट्या आणि सण-उत्सवामुळे वाढलेल्या गर्दीमुळे तासनतास महामार्ग ठप्प होत आहे. नगर–मनमाड महामार्गावरील कोल्हार पुलाजवळील खड्ड्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. त्यामुळे अनेक भाविकांचे शिर्डीतील साईबाबा आणि शनीशिंगणापुरातील शनीदेव दर्शन हुकत आहे. सततच्या कोंडीमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.