संगमनेर शहराजवळील घुलेवाडी गावातील शासकीय आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून अद्यापही प्रशासनाला तोडगा काढण्यात अपयश आले आहे. वसतिगृहाची दुरावस्था तसेच आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर तोडगा कधी निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.