श्रावण मासातील शेवटच्या सोमवारी बुलढाणा जिल्ह्यातील साखळी गावात दरवर्षीप्रमाणे भैरवनाथ कावड यात्रेचं भव्य आयोजन करण्यात आलं. या यात्रेत शेकडो भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. यात्रेदरम्यान आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते भव्य महाआरती पार पडली. गुलालाची उधळण, “हर हर महादेव” आणि “बम बम भोले”च्या गजराने परिसर दुमदुमून गेला. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली, तर महिला, पुरुष आणि लहानग्यांनी मोठ्या उत्साहात गर्दी करून यात्रेचा आनंद लुटला.












