मुंबई, पुण्यासह राज्यभरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने ठाणे, रायगड, सातारा, या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तर ऑरेंज अलर्ट रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली या जिल्ह्यांना दिला आहे. पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या उद्याच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तर लोकल सेवेलाही मोठा फटका बसला आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे.












