पुण्यात पावसाचा जोर कायम असून, शहरातील काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असली, तरी जर पाऊस असाच सुरू राहिला, तर धरण साखळी क्षेत्रात विसर्ग वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितलं की, सर्व यंत्रणांशी संपर्कात असून, शहरी भागांमध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जिथे पूर नियंत्रण रेषा आहे, तिथल्या नागरिकांना गरज पडल्यास स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.