महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सरकार सज्ज आहे का?मुंबई व कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३०० मिमी पाऊस, तर नांदेड, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी व पालघरमध्येही ‘रेड अलर्ट’ जारी आहे. रस्त्यांवर पाणी, स्थानिक रेल्वे व मोनोरेल सेवा ठप्प, उड्डाणे उशिरा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. धरणेही पूर्ण क्षमतेला पोहोचली आहेत; वारणा व कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. पावसामुळे १४ लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले असून कांदा व ज्वारी पिकांना मोठा फटका बसला आहे. फक्त आता एक प्रश्न उपस्तित होत आहे सरकार ह्या आपदेला तोंड द्यायला तयार आहे का ?