थायलंडने पर्यटन क्षेत्र पुनरुज्जीवित करण्यासाठी नवीन योजना सुरू केली आहे. “TouristDigipay” अंतर्गत विदेशी पर्यटक आता क्रिप्टोकरन्सी थाई बातमध्ये रूपांतर करून देशात खर्च करू शकणार आहेत. ही योजना २०२५ च्या चौथ्या तिमाहीपासून १८ महिन्यांच्या पायलट प्रोग्राममध्ये सुरू होणार असून, वित्त मंत्रालय, सिक्युरिटीज कमिशन, मनी लॉन्ड्रिंग विरोधी कार्यालय आणि पर्यटन मंत्रालय यांच्या सहयोगाने राबवली जाणार आहे.