आंबेगाव बुद्रुक येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलाठी पती शंकर दिवेकर यांनी पॅरालिसिस झालेल्या पत्नी स्वाती यांना जबरी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. जुन महिन्यात दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्यामुळे पत्नीला घटस्फोट दे, असा दबाव टाकून वारंवार शिवीगाळ व मारहाण केली जात होती. १७ ऑगस्ट रोजी किरकोळ वादावरून शंकर यांनी पत्नीला लाथा-बुक्यांनी, खुर्चीने मारहाण करत गंभीर जखमी केलं. या प्रकरणी स्वाती यांच्या फिर्यादीवरून आंबेगाव पोलिस स्टेशनमध्ये शंकर दिवेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












